Rugnancha Ashadeep: Lady with the Lamp: Florence Nightingale
Rugnancha Ashadeep: Lady with the Lamp: Florence Nightingale
Goel Prakashan

Rugnancha Ashadeep: Lady with the Lamp: Florence Nightingale

Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 250.00 Unit price per
Free Shipping

 निर्भयी व धडाडीची सेवाभावी वृत्ती आणि स्वीकारलेल्या कार्यावरील प्रचंड निष्ठा, या बळावर रुग्णांची शुश्रूषा करून त्या सेवेला जगभर प्रतिष्ठा मिळवून देणारी फ्लॉरेन्स नाईटिंगेल ही इंग्रज परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या (शुश्रूषा) संस्थापिका आहेत.
 
रशियाविरूध्द ब्रिटन, फ्रान्स, सार्डेनिया व तुर्कस्तान या देशांबरोबर क्रिमिया येथे १८५४ मध्ये मोठे युध्द सुरू झाले. तुर्कस्तानातील सर्व सैनिकी रुग्णालयातील रुग्णपरिचर्याविषयक व्यवस्थेची जबाबदारी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्यावर सिडनी हर्बर्ट यांनी सोपवली आणि ती तिनं चोखपणे पार पाडली. सैनिकी रुग्णालय अतिशय गलिच्छ आणि आरोग्यदृष्ट्या दुर्लक्षित होते. रोग्यांची संख्या मोठी आणि वैद्यकीय साधनांचा अभाव अशी स्थिती होती. फ्लॉरेन्स यांनी मोठ्या जिद्दीनं आणि संयमानं त्या अव्यवस्थेतून सुव्यवस्था निर्माण केली. त्या वेळी लष्करी अधिकारी आणि डॉक्टर यांनी केलेला विरोध न जुमानता तिनं रुग्णसेवेला सुरुवात केली. त्यामुळे जखमी व आजारी सैनिकांच्या आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडून तर आलेच, पण मृत्यूचं प्रमाणही कमी झालं.
१८८३ मध्ये राणी व्हिक्टोरियाने फ्लॉरेन्सला ‘रॉयल रेड क्रॉस’ प्रदान करून तिचा सन्मान केला. पुढे १९०७ मध्ये ब्रिटिश सरकारकडून ऑर्डर ऑफ मेरिट हा किताब तिला बहाल करण्यात आला. हा किताब  मिळविणारी ती पहिलीच महिला होती. यातून तिच्या कार्याचे महात्म्य अधोलेखित व्हावं! इ.स. १८६० मध्ये फ्लॉरेन्सने लिहिलेला ‘नोट्स ऑन नर्सिंग’ हा तिचा ग्रंथ जगभर गाजला. फ्लॉरेन्सच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा तिचा जन्मदिवस जगभरामध्ये जागतिक परिचर्यादिन म्हणून साजरा केला जातो.

Share this Product