Goel Prakashan
How the BJP Wins (Marathi)
Regular price
Rs. 250.00
Free Shipping
'भाजपची विजयी घोडदौड' प्रशांत झा यांनी अगदी नेमकेपणाने व मोठ्या कष्टाने शब्दबद्ध केली आहे. निवडणूका नंतर निवडणूका भाजप कसा जिंकत गेला, याचा साद्यंत वृत्तात यात आहे. यातही पडणाऱ्या प्रत्येक घटनेचे स्वरुप, त्या मागची दृष्टी या उद्देश, घटनेची परिणामकारकता याचा वेध नेमकेपणाने प्रशांत झा घेतात.
उत्तर प्रेदशची निवडणूक आणि त्यात भाजपला मिळालेले घवघवीत यश, भाजपचे निवडणूकींचे तंत्र व मंत्र, मोदींचे प्रभावी व्यक्तिमत्व आणि त्यांची हवा, जातीची वेगवेगळी समीकरणे, अमित शहांचे संघटन कौशल्य तसेच जातीयत्त्वाचा रोष पत्करून पक्षाने साधलेला विकास, वेगवेगळ्या आघाड्यांना व लोकांना आपल्या प्रवाहात सामील करून घेण्याचा पक्षाने केलेला प्रयत्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपची सावलीसारखी केलेली पाठराखण अशा एक ना अनेक गोष्टींचा शोध प्रशांत झा यांनी प्रत्यक्षदर्शी जाऊन तसेच नानाविध मुलाखतीतून घेतला आहे.
वरवर पाहता प्रशांतचे पुस्तक विश्लेषणात्मक जरी वाटले तरी कोणताही सिद्धांतिक आव ते आणत नाही. कोणत्याही आदर्शवादाचा आधार न घेता है पुस्तक आपल्याला सत्याच्या जास्तीत जास्त जवळ नेते. समकालीन भारतीय सामाजिक व राजकीय प्रवाहाचे स्वरुप व त्याची व्याप्ती, नानाविध परंपरा व त्यामागच्या प्रेरणा ज्यांना जाणून घ्यायच्या असतील, त्यांनी हे पुस्तक जरूर वाचायला हवे!
- योगेंद्र यादव