The Miracle Morning (Marathi)
Goel Prakashan

The Miracle Morning (Marathi)

Regular price Rs. 250.00 Rs. 250.00 Unit price per
Free Shipping

आनंद हा माणसाचा स्वभाव आहे. या आनंदाचा व पहाटेच्या सौंदर्याचा साक्षात्कार पहाटे लवकर उठल्यानंतर आणि निसर्गाच्या सहवासात गेल्यानंतरच तुम्हाला मिळणार आहे. मी तर म्हणेन की तुम्ही प्रथम दुःखी होणे, निराश होणे थांबवा !

मी ज्यावेळी मृत्यूशय्येवर होतो तेव्हा मी सतत घोकत होतो की, मला आरोग्य हवे आहे, मला जगायचं आहे. पण असे म्हणत मी पुन्हः पुन्हा आजारालाच चिकटून रहात होतो. एका जागरूक क्षणी माझ्या हे लक्षात आलं आणि मग मी भानावर आलो.

पहाटे उठल्यानंतर मी निर्देश केलेल्या (आंतरिक शांतता, सकारात्मक विचारसरणी, मनःचक्षूपुढे आपल्या ध्येय उद्दिष्टपूर्तीचे दर्शन, दर्जेदार-अभिजात ग्रंथांचे वाचन, लेखनाची वा स्वतःला कागदावर आविष्कृत करण्याची सवय आणि शारीरिक-मानसिक कसरती वा व्यायाम-योगासने व प्राणायाम) सहा सवयी संपूर्णपणे अंगीकृत करणे, हा एक जगण्याचा उत्तम मार्ग आहे.

प्राणी, झाडं, पक्षी आनंदाने गात असतात, विहार करीत असतात. अगदी मुक्तपणे ! संपूर्ण अस्तित्व आनंदी आहे. पण माणूसच मात्र दुःखाला आपल्या उराशी कवटाळून बसतो. तो निराश होतो. एकटेपणातील काळोख्या अंधारात स्वतःला कोंडून घेतो. मित्रहो, तुम्ही आत्ता जे जगत आहात, ती पद्धत आजार निर्माण करते आहे.

लक्षात घ्या, The Miracle Morning च्या सौंदर्यासोबत तुम्ही स्वीकारलेली सोबत तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे.


Share this Product