Goel Prakashan
How to Stop Worrying and Start Living
Regular price
Rs. 199.00
Free Shipping
चिंता हा विचारांचा व्यापार आहे. विचारांचा गुंता आहे. या विचारांच्या रिंगणात माणूस एकदा अडकला की, तो एकाच जागी घुटमळत राहतो आणि आपल्या चिंतेत जळत राहतो. चिंता तुमच्या मनाला, शरीराला आणि तुमच्या हृदयाला देखील एखाद्या भुंग्याप्रमाणे पोखरत राहतात. चिंताग्रस्त माणूस हा शारीरिक रोगांना नेहमीच आमंत्रित करीत असतो. ब्लड प्रेशर, मुधमेह, अल्सरसारखे विकार माणसाला जडतात, ते केवळ आणि केवळ तुमच्या चिंतेतूनच! चिंता म्हणजे अयोग्य गोष्टींचा सतत विचार करीत राहणे. मित्रहो, आयुष्य हे चिंता करण्यासाठी खूप लहान आहे. तेव्हा हाती असलेल्या क्षणातील आनंद वेचा! मुख्य म्हणजे चिंतामुक्त व्हा! चिंतामुक्तीच्या काही दिशा व दृष्टी प्रस्तुत ग्रंथात अतिशय काळजीपूर्वक उलगडून दाखवली आहेत. प्रत्यक्ष अनुभवातून व शुद्ध निरीक्षणातून नोंदवलेल्या विचारांना आपलेसे करा आणि आनंदाने जगा!