Nisargopchar
Nisargopchar
Nisargopchar
Goel Prakashan

Nisargopchar

Regular price Rs. 250.00 Rs. 200.00 Unit price per
Free Shipping

मनुष्याची नैसर्गिक अवस्था म्हणजे, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदमय जीवन होय. ह्या सर्व गोष्टींचं महत्त्व प्रस्तुत पुस्तक विशद करतं. त्यादृष्टीने निसर्गोपचारांचे विविध पैलू, त्यांची उपचारपद्धती आणि वैशिष्ट्यं वाचकांसमोर उलगडतात. निसर्गोपचारांतल्या, ताजी-स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, साधा सात्त्विक आहार या मूलतत्त्वांच्या सुयोग्य अवलंबनातून रोगनिवारण कसं करता येऊ शकेल, याविषयी माहिती त्यात उद्धृत केली आहे. रोगोत्पत्ती आणि रोगमीमांसा यांच्या अभ्यासातून निसर्गोपचारांच्या साहाय्याने शरीरातून रोगबीजं नष्ट करता येतात, हा विश्वास सर्वसामान्यांच्या मनात निर्माण करणारा हा वाचनानुभव आहे. 

शारीरिक व्याधींवरील उपचारांबरोबरच मानसोपचारांतलंही निसर्गोपचारांचं महत्त्वाचं स्थान या पुस्तकातून अधोरेखित होतं. त्यादृष्टीने, विरेचन, एनिमा, तसंच फलाहार, मातीचे उपचार, जलचिकित्सा अशा सर्वंकष पैलूंचा उलगडा या पुस्तकातून होतो. केवळ माहितीवजा असं त्याचं स्वरूप नाही, तर अतिशय शास्त्रशुद्ध तात्त्विक विवेचनात्मक असं हे पुस्तक आहे. म्हणूनच, रोगनिवारणासाठी आजच्या अत्यंत आधुनिक उपचारपद्धती जरी अनुसरल्या, तरीही मानवजातीचा निसर्गाशी असलेला अनुबंध कालातीत असा आहे, हे निसर्गोपचारांचं महत्त्व स्पष्ट करणारं पुस्तक प्रत्येकाकडे असायलाच हवं.


Share this Product